-
हो
-
1) आपण नोंदणी केल्यास, आपल्याला प्रगती माहिती आणि प्रगती इतिहास एकत्रितपणे पाहता येईल.
2) आपण एक लहान देणगी देऊन जाहिरातींशिवाय शिकू शकता.
-
तुमच्याकडून एखादी छोटीशी देणगी मिळाल्यानंतर, आम्ही आपल्या खात्यातून जाहिराती काढून टाकतो. ही हाताने करायची कार्यपद्धती असल्यामुळे कृपया थोडी वाट पहा.
-
आपण खालील प्रकारे मदत करू शकता- 1) आपल्याला काय आवडते आणि काय आवडत नाही याबद्दल टिप्पण्या लिहून
2) शिक्षण्याचा अनुभव सुधारण्यासाठीच्या (आणि अर्थातच इतर कशाही बद्दल) आपल्या कल्पना लिहून
3) आमच्याबद्दल आपल्या मित्रमंडळींना सांगून (सामाजिक नेटवर्कवर आमची वेबसाइटवर शेअर करून, https://www.facebook.com/TouchTypingStudy वर आम्हाला सामील होऊन)
-
टच टाईप शिकण्यासाठी लागणारा वेळ हा आपल्यावर अवलंबून आहे. त्याचा नियमितपणे सराव करणे महत्वाचे आहे. चांगल्या परिणामांसाठी, एका दिवसात किमान एक धडा करणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, सर्व अक्षरे कुठे आहेत हे माहित आहे म्हणजे आपण जलद टायपिंगसाठी तयार आहात असे नाही.
आपल्या बोटांनी आवश्यक हालचाली विकसित करणे आवश्यक आहे किंवा ज्याला 'स्नायू हालचाल स्मृती' असे म्हणतात - ज्यामुळे कळेचा विचार न करता किंवा कीबोर्डकडे न पाहता टाइप करता येईल अशा पद्धतीने प्रत्येक कळ ठेवलेली असते. स्वयंचलित हालचाली ह्या फक्त खूप पुनरावृत्तीतूनच विकसित होतात. लक्षात ठेवा - फक्त सरावानेच आपण परिपूर्ण होतो! - दुसऱ्या कशानेच नाही!
-
प्रति मिनिट शब्द WPM मोजण्यासाठी सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आपण एका मिनिटात किती शब्द टाईप केले आहेत ते मोजतो. 1 शब्द = 5 अक्षरे, मोकळी जागा आणि विरामचिन्हे यांना धरून.
-
तांत्रिक बाजूचा विचार करता, आपल्याला फक्त इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. तथापि, स्वतःचे टच टायपिंग कौशल्य सुधारण्याची इच्छाशक्ती आणि प्रेरणा यांची देखील आवश्यकता आहे.
-
टाइपिंग सुरू केल्यावर Caps Lock कळ चालू नाही ना याची खात्री करून घ्या. ज्यावेळी Caps Lock कळ चालू असते तेव्हा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आपल्याला एकाच वेळी Shift कळ आणि संबंधित अक्षर दाबा असे सांगतो.
-
ज्यांना स्वतःचे टच टायपिंग कौशल्य विकसित करायचे आहे अश्या सर्वांसाठी टायपिंग स्टडी हे बनवलेले आहे. टच टायपिंग हे एक असे कौशल्य आहे ज्यामुळे योग्य कळ शोधण्यासाठी कीबोर्डकडे पाहायला न लागता टाइप करता येते.
-
होय, टायपिंग स्टडी हे डिसलेक्सिआ असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा योग्य आहे. टच टायपिंग कौशल्य असल्यावर डिसलेक्सिआ असणाऱ्या लोकांना, टच टायपिंग कौशल्य नसलेल्या व्यक्तीपेक्षा एक वेगळा फायदा आहे. (डिसलेक्सिआ असणाऱ्या लोकांना हस्तलिखीत मजकूरामुळे अडचण येते. टाईप केलेल्या मजकूराचा त्यांना गती आणि वाचनीयता ह्या दोन्ही दृष्टिकोनातून मोठा फायदा होईल.) आणि अर्थातच मजकूर संगणकावर असल्यावर फार मोठी मदत होते कारण त्यामुळे शब्दलेखन तपासणी करणे शक्य होते!