आपण अजूनही दोन बोटांनी टाइप करीत आहात ? आपल्याला अजूनही प्रत्येक कीस्ट्रोक करण्यापूर्वी आपला कीबोर्ड पहावा लागतो?
टच टाइप स्टडी ही एक मोफत आणि वापरकर्त्याला सोपी अशी वेबसाइट असून ज्यामुळे आपल्याला टायपिंग शिकून त्याचा सराव करता येईल आणि, आपली टायपिंगची गती आणि अचूकता सुधारता येईल.
एकदा तुम्हाला टच टाइप करता येऊ लागले की, अक्षरे शोधण्यासाठी तुम्हाला कीबोर्ड पाहण्याची गरज भासणार नाही. तसेच तुम्ही अधिक चांगल्या गतीने टाइप करू शकाल.
टच टायपिंग पद्धती ही दृष्टीवर आधारीत नसून स्नायूंच्या स्मृतीवर आधारित पद्धत आहे. ह्या पद्धतीमुळे डाटा एंट्री खूपच चांगल्या गतीने करणे शक्य आहे, विशेषतः जिथे डोळ्यांनी बघून मजकूर लिहायचा आहे.
टच टायपिंग पद्धतीने आपल्या संगणकाची उत्पादकता लक्षणीय सुधारते; ही पद्धत डाटा एंट्रीची गती वाढविते आणि, शक्य तिथे थकवा आणि डोळ्यांना होणारे नुकसान कमी करते.
टच टाइपिंग स्टडी मध्ये १५ धडे, एक गती चाचणी आणि काही खेळ यांचा समावेश आहे ज्यामुळे तुम्ही क्रमा-क्रमाने टाइपिंग शिकून, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता.